नांदेड(प्रतिनिधी)-सरस्वतीनगर कौठा भागातील एक घरफोडून चोरट्यांनी त्यातून 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच गागलेगाव ता.बिलोली येथून घरासमोर उभे असलेले ट्रक्टर 1 लाख 95 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
किरण माधवराव मामीडवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 नोव्हेंबरच्या दुपारी 4 ते 17 नोव्हेंबरच्या सकाळी 9 वाजेदरम्यान सरस्वतीनगर कौठा येथील त्यांचे घरफोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे आणि 3 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 1079 नुसार दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक एम.एस.गायकवाड हे करीत आहेत.
शिवकुमार चंद्रशेखर मगपल्ले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 नोव्हेंबरच्या रात्री 10 ते 13 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेदरम्यान गागलेगाव ता.बिलोली जि.नांदेड येथे आपल्या घरासमोर उभे केलेले ट्रक्टर क्रमांक एम.एच.26 बी.क्यु.8704 हे 1 लाख 95 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 291/2024 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शेख करीत आहेत.
Post Views: 69