नांदेड(प्रतिनिधी)-16 नांदेड लोकसभा पोट निवडणुक आणि सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीतील मतदारांनी समृध्द लोकशाहीसाठी न चुकता जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन नांदेड जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
आज प्रचार संपण्याच्या वेळेस बोलावलेल्या पत्रकार परिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके यांच्याससह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले. नांदेड जिल्ह्यात पाच मतदान केंद्र संवेदनशिल आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा पुरेपुर फायदा जनतेने घ्यावा.नांदेड जिल्ह्यात नव्याने 18 हजार मतदारांची नुतन नोंदणी झाली आहे. जनतेनेने कोणत्याही आमिषाला बळी न पडता जास्तीत जास्त मतदान करावे आणि मतदानाचे प्रमाण वाढवावे. कारण जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केले तर लोकशाही सुदृढ होण्याच मदत होत असते.
Post Views: 29