नांदेड(प्रतिनिधी)-दोन गटांनी लाठ्या-काठ्या घेवून धर्माबाद येथील अहिंसा परमो धर्मचे प्रतिक असणाऱ्या भगवान महाविर चौकात घातलेला गोंधळ अत्यंत दैयनिय अवस्था दाखवत होता. महाराष्ट्रात सुध्दा आता दबंगगिरी करणाऱ्या लोकांची वरचढ झाली आहे का असा प्रश्न या निमित्तातून समोर आला आहे.
तेलंगणा सिमेवर असलेले नांदेड जिल्ह्यातील शेवटचा तालुका धर्माबाद अत्यंत शांतताप्रिय आणि व्यापारी वर्गाचा प्रस्थ असलेला तालुका. कामधंदा करणे, पैसे कमावणे आणि आपल्या कुटूंबाचे भले करणे यात धर्माबाद तालुका नामांकित आहे. काल दि. 23 ऑक्टोबर रोजी दुपारी सोशल मिडीयावर काही व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामध्ये दोन्ही बाजूने 100 पेक्षा जास्त लोक हातात लाठ्या-काठ्या घेवून एक दुसऱ्यांना मारत होते. चार चाकी गाड्या फोडत होते. पोलीस ठाण्यापासून जवळच असणाऱ्या या घटनास्थळी पोलीस नेहमी प्रमाणे उशीराच आले. त्यामुळे अनेकांचे डोके फुटले. हा सर्व प्रकार शेतीच्या वादातून घडला आहे. आणि बेकायदारितीने त्या जमीनीचा ताबा घेण्यासाठी आलेला गट आणि त्यांच्या विरुध्दचा गट असा मारहाणीचा प्रकार घडला.
याबद्दल सनदी लेखापाल असलेले अनमोल महेंद्रकुमार पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रत्नाळी शिवारात नरहरी लक्ष्मण चव्हाण, विनोद बोईनवाड, पिराजी चव्हाण, देवराव लक्ष्मण वैनवट सर्व रा. धर्माबाद आणि यांच्यासोबत इतर 30 ते 35 यांनी त् यांच्या मालकीच्या शेतात बेकायदेशीर कब्जा करण्यासाठी आले. शेतातील कापुस पिक चोरू नेऊन ते नष्ट केले, त्यांच्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकरणात त्यांना आणि साक्षीदारांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. धर्माबाद पोलीसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2), 118(1), 1889(2), 1990, 324(4), 190(2), 191(2)(3), 352, 351(2), 351(3), 303(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 98/2024 दाखल केला आहे. या घटनेचा तपास धर्माबादचे पोलीस निरिक्षक बालासाहेब रोकडे हे करणार आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक होईल असे पोलीस निरिक्षक रोकडे सांगत होते.
या बातमीसोबत व्हायरल झालेले मारहाणीचे व्हिडीओ वाचकांच्या अवलोकनासाठी जोडले आहेत.
व्हिडिओ..2
Post Views: 1,965