भारताचे पंतप्रधान विदेश दौऱ्यावर आणि गृहमंत्री महाराष्ट्राचा विधानसभा प्रचार सोडून दिल्लीला परतले. काल शासनाचे मानले जाणाऱ्या प्रसार माध्यमांनी अमित शाह हे मणीपुर येथील परिस्थितीमुळे परत गेल्याचे म्हटले. अजबच वाटायला लागले आहे. कारण मनीपुर काही कालच जळाले असे नाही. गेल्या अडीच वर्षापासून जळत आहे. काल तेथे काही बीजेपी समर्थक आमदारांची घरे जाळण्यात आली. सोबतच बांग्लादेशमध्ये पाकिस्तानने प्रवेश केला आहे. सहा महिन्यात पीओके भारतात राहिल म्हटलेली तारीख कालच संपलेली आहे. काय चालले आहे या देशात आणि कोणत्या तोंडाने आम्हीच या देशाचे रक्षक आहोत असे दाखविण्याचा सुरू असलेला भिकारचोट प्रयत्न लोकशाहीसाठी किती दुर्देवी आहे.
विदर्भातील आपल्या तीन सभा रद्द करून भारताचे गृहमंत्री परत दिल्लीला रवाना झाले आणि नंतर संध्याकाळी ही माहिती समोर आली की, मणीपुरमध्ये आग लागली आहे. मणीपुरची आग तर अडीचवर्षापार्सूीन लागलेली आहे. त्यातील सर्वात दुर्देवी घटना असा उल्लेख केला जाईल तर कौरवांनी द्रोपदीसोबत महाभारतात केलेली घटना आणि मणीपुरमध्ये भारतीय सैनिकाच्या पत्नीसोबत घडलेली घटना या दोन्ही घटना एकच आहे. पण अडीचण वर्षात कोणीही पांडव मणीपुरसाठी उभा राहिलेला नाही. संसदेच्या वातानुकूलीत कक्षात इतरांना तुम्ही किती खालच्या दर्जाचे आहात हे दाखविण्यामध्ये आपली मर्दूंमकी दाखविण्यात भारतीय जनता पार्टीला गाजविल्यासारखे वाटते. पण भारतातील सत्य काही वेगळे आहे. गृहमंत्री दिल्लीला गेले खरे पण त्या अगोदर सिमा सुरक्षा दलाचे महासंचालक त्यांनी येण्याअगोदरच मणीपुरला रवाना झाले होते. मणीपुरमध्ये लागलेली आग कधी विझेल याचा आज तरी काही नेम नाही. कारण मणीपुरचा मुख्यमंत्री सुध्दा भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि तो पंतप्रधान, गृहमंत्र्यांसोबत कसा व्यवहार करतो याचे काही ऑडीओ सुध्दा मागे व्हायरल झाले होते. म्हणजे तुम्ही आपल्या सैनिकांच्या पत्नींची रक्षा करू शकत नाही. तर भारतभरातील महिलांना आम्ही सुरक्षा देवू हा खोटारडे पणा आता टिकणार नाही.
कालच एक नवीन बातमी आली अमेरिकेतील एका हॅकरने महाविकास आघाडीच्या एका खासदाराला फोन करून तुम्ही मला 52 कोटी रुपये दिले तर मी तुम्हाला महाराष्ट्राची निवडणुक जिंकून देईल असे सांगितले. त्यामुळे देशात खळबळ माजली आहे. त्या हॅकरसोबत काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुध्दा बोलणे केले. तो सांगत होता की, 288 मतदार संघापैकी 281 मतदार संघांची लिंक त्याच्याकडे आहे. तेथे जाणारे ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅड याचा क्रमांक मला दिला तर मी ते हॅक करू शकतो आणि ईव्हीएम आलेले मतदान कोणाला किती करायचे हे करून देवू शकतो. निवडणुक आयोगाने ईव्हीएम हे 100 टक्के फुलप्रुफ आहे असे सांगून आपल्याविरुध्द आलेल्या सर्व याचिकांचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लावून टाकला. पण आता या हॅकरच्या सांगण्यामुळे आज देशात माजलेली खळबळ काही नवीन नाही. कारण याच हॅकरने काही वर्षापुर्वी अमेरिकेत पत्रकार परिषद घेवून प्रात्यक्षीक करून दाखविले होते की, ईव्हीएम कसे हॅक करता येते. या सर्व प्रकारानंतर ही शंका येणे सुध्दा चुकीची नाही की, अशीच काही पध्दत अवलंबली असेल म्हणूनच भारताचे पंतप्रधान विदेश दौऱ्यावर आणि गृहमंत्री परत दिल्लीला गेले असतील.
जात हा शब्द भारतीय संविधानाने संपविला असला तरी आजच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा, ओबीसी आणि अनुसूचित जाती यांच्यामध्ये भेद करून निवडणुक जिंकण्याचा आखलेला डाव आता जनतेने ओळखलेला आहे. दुर्देव म्हणजे कोणताही राजकीय पक्ष सत्ताधारी असेल किंवा विरोधी असेल भविष्याच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेसाठी या मार्गाने आम्ही विकास आणणार आहोत हे कोणी सांगत नाही. सत्ताधारी पक्षाने निवडणुकी पुर्वी शासनाच्या पैशाने अर्थात जनतेच्या पैशाने जनतेला काही योजनांच्या आधारावर दिलेल्या रोख रक्कमा ही एका प्रकारे लाचच आहे. यावर विरोधी पक्ष सुध्दा आम्ही यापेक्षा वाढीव रक्कमेच्या योजना देवू असे सांगून जतनेला पुन्हा फसवत आहे.
मागील एक आठवड्यापासून वास्तव न्युज लाईव्ह अशा विविध विश्लेषणामधून जनतेसमोर त्यांनी काय केले पाहिजे हे मांडत आहे. यंदाची महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक ही महाराष्ट्रातच ईतिहास घडविणार नाही तर ही निवडणुक देशात ईतिहास घडविल हे लक्षात ठेवून महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या बुध्दीचा वापर करून योग्य व्यक्तीला मतदान करावे यासाठी हे परिश्रम.
Post Views: 25