रात्री मोबाईलवर कॉल करून गुन्हा दाखल, जेलची भिती दाखवून 6 लाख 80 हजारांची फसवणूक


नांदेड(प्रतिनिधी)-मोबाईलनंबरवर फोन करून वेगवेगळ्या भिती दाखवत लोकांकडून ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत चालले आहेत. शासनाने ऑनलाईन हस्तांतरण काही दिवसांसाठी स्थगित केले होते. परंतू आता त्वरीत हस्तांतरण होत असल्याने ही फसवणूक जास्त प्रमाणात वाढत चालली आहे. असाच एक प्रकार 17 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये घडला. पुढे पिडीत व्यक्तीला अटकेची भिती दाखवून त्याला ऑनलाईन प्रकारात 6 लाख 80 हजार रुपये हस्तांतरण करायला लावले यास ंदर्भाने पिडीत व्यक्तीने ऑनलाईन तक्र्रार केली आहे.
नांदेड शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीला 17 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या 12 वाजेनंतर त्यांच्या मोबाईलवर कॉल आला आणि त्यांना सांगण्यात आले की, विमानतळावर तुम्ही पाठविलेले कुरिअर तपासण्यात आले तेंव्हा त्यामध्ये अंमलीपदार्थ आहेत. त्यानंतर विमानतळाच्या व्यक्तीने तो फोन दिल्ली पोलीसांना ट्रान्सफर केला. कोणी तरी विजय यादव हे बोलत होते आणि तुमच्यावर आताच गुन्हा दाखल झाला आहे, असे सांगत नांदेडच्या व्यक्तीला धमकी दिली. सोबतच बोलणाऱ्या विजय यादवने दुसऱ्याला विचारले यांच्यावर दुसरा काही गुन्हा आहे काय बघ तेंव्हा तो म्हणाला यांच्याविरुध्द दुसरा एक गुन्हा अवैध रक्कम यांच्या खात्यावर जमा झाली त्या संदर्भाचापण आहे. तेंव्हा विजय यादवने पिडीत व्यक्तीला सांगितले की, आम्ही त्या प्रकरणात संजयसिंह नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याने तुमचे नाव घेतले आहे आणि तुमच्या परवानगीने करोडो रुपयांची अवैध रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाली असल्याचे सांगितले. सोबतच विजय यादवने पिडीत व्यक्तीला सांगिततले, रात्र असली तरी आमची तुमच्यावर नजर आहे. पळू जाऊ नका नाही तर तुम्हाला अटक करून हातकड्या टाकून दिल्लीला आणले जाईल.
या सर्व संभाषणाने गांगरलेल्या पिडीत व्यक्तीने माझा असा काही प्रकार नसल्याचे सांगितले तेंव्हा वेगवेगळ्या प्रकारे पिडीत व्यक्तीचा ब्रेन वॉश करून आता माझ्या जीवनाचा काळ वाईट झाला असल्याचे त्याच्या मनावर बिंबवले आणि त्याच्या बॅंक खात्यातून 6 लाख 80 हजार रुपये आपल्या खात्यात वळती करून घेतले. 17 नोव्हेंबरचा सुर्योदय झाल्यानंतर रात्रभर त्रासात असलेल्या पिडीत व्यक्तीने शासनपाच्या ऑनलाईन पोर्टलवर आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची तक्रार केली आहे. पुर्वी ऑनलाईन वळती झालेल्या पैशांना दुसऱ्याच्या खात्यात जमा होण्यासाठी भरपूर वेळ लागत होता. पण आता ही पध्दती त्वरीत प्रभावात झाल्यामुळे अशा ऑनलाईन फसवणूकीची संख्या वाढली आहे.
वास्तव न्युज लाईव्ह नेहमीच जनतेने जागरुक व्हावे म्हणून अशा बातम्यांना प्राधान्य देत असते आजही आमची जनतेला विनंती आहे की, अशा कोणत्याही कॉलला प्रतिसाद देऊ नका, त्याच्या सांगण्याला प्रतिसाद देऊ नका आणि घडलेला सर्व प्रकार जवळच्या पोलीसांना सांगा. तुम्ही चुक नसाल तर पोलीस तुमचे काही करणार नाहीत. नाही तरी पोलीसांची ही जबाबदारीच आहे की, पिडीत व्यक्तीला त्यांना मदत करायची आहे. तेंव्हा पुन्हा एकदा कोणत्याही व्यक्तीने मोबाईलवर फोन करून धमक्या दिल्या आणि ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले तर ते करू नका एवढीच इच्छा आहे.
—–


Post Views: 5






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *