नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय स्तरावरील एका विशिष्ट पक्षाच्या दोन लोकांकडून अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी 7 लाख 70 हजार 500 रुपये रोख रक्कम जप्त करून दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम आणि त्यांचे सहकारी काल दि.18 नोव्हेंबर रोजी दुपारी गस्त करत असतांना त्यांना शंका आलेल्या दोन व्यक्तींना त्यांनी थांबवून त्यांनी तपासणी केली असतांना एकाकडे 7 लाख 11 हजार 500 रुपये मिळालीे. अशाच एका दुसऱ्या व्यक्तीनकडे 59 हजार रुपये रोख रक्कम होती. पोलीस निरिक्षक कदम यांनी या दोन लोकांविरुध्द मतदारांना पैसे वाटून आमिष दाखविण्याच्या प्रयत्नासाठी गुन्हे दाखल केले आहेत.
Post Views: 18