नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.70 टक्के मतदान झाले आहे. पुढे सहा वाजेपर्यंत आणि सहाच्या पुढील रांगेत शिल्लक असलेले मतदार असा टक्का वाढवला तरी एकूण मतदान 65 टक्केपर्यंत पोहचले असे वाटते. मागील निवडणुकीपेक्षा 65 टक्के हा आकडा मतदान कमी झाल्याचा आहे. करोडो रुपये मतदान करण्याच्या जनजागृतीसाठी खर्च केल्यानंतर सुध्दा मतदानाचा टक्का काही वाढत नाही. त्यासाठी आता कायदाच होणे आवश्यक आहे.
आज विधानसभा सार्वत्रिक निवडणुक संदर्भाने नांदेड जिल्ह्यात 9 मतदार संघांमध्ये मतदान झाले. तसेच लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान सुध्दा झाले. त्यामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत आलेल्या खात्रीलायक माहितीनुसार विधानसभा निवडणुकीमध्ये 55.88 टक्के मतदान झाले आहे तर लोकसभा पोटनिवडणुकीत 56.78 टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा पुढील एक तासाचा वेळ आणि त्यानंतर मतदान केंद्रावर रांगेत उभे राहिलेल्या मतदारांना मोजून जरी पाहिले तर लोकसभा पोट निवडणुक आणि विधानसभा निवडणुक यांचा आकडा एकूण 65 टक्के पर्यंत पोहचले काय ही बाब वृत्तलिहिपर्यंत नकारात्मकच दिसते. कारण मागील विधानसभा निवडणुक 2019 मध्ये मतदानाची आकडेवाडी 67.83 एवढी मतदानाची टक्केवारी होती. त्यामुळे मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी करोडो रुपये खर्च करून जनजागृती करण्याऐवजी मतदान न करणाऱ्याविरुध्द काही कार्यवाही होईल असा कायद्याच आणणे आवश्यक आहे.
आज सकाळपासून सुरू झालेल्या मतदानात कोठेही काही घडबड झाल्याची खबर वृत्त लिहिपर्यंत आली नव्हती. मतदान करणाऱ्यांमध्ये नव मतदार, महिला, पुरूष, तृतीयपंथी, वयोवृध्द व्यक्ती यांनी सहभाग घेतला. मतदानाची प्रक्रिया पाहतांना असे वाटत नव्हते की, मतदान करण्यामध्ये लोकांना खुप उत्साह आहे. परंतू प्रक्रिया सुरू होती. काही ठिकाणी मतदारांची गर्दी जास्त दिसत होती. काही ठिकाणी विरळ मतदार दिसत होते. वेगवेेगळ्या गल्यांमध्ये वेगवेगळा प्रभाव जाणवत होता. सोबतच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्यासह सर्वांची आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी सुध्दा मतदानाची पाहणी करतांना शक्तीनगरमधील भारत विद्यालय, देगलूर नाका येथील मदिनातुल उलूम शाळा, शिवाजी विद्यालय सिडको येथे भेटी देवून लोकांशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीला समजून घेतले. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, पोलीस अंमलदार सुरक्षा बलाच्या कंपन्या, तेलंगणा पोलीस, तेलंगणा होमगार्ड, महाराष्ट्र होमगार्ड, एनसीसीस छात्र, एनएसएस छात्र, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत करून निवडणुकीला गालबोट लागणार नाही यासाठी मेहनत घेतली.
निवडणुक मतदान केंद्रावर लोकांना रोजंदारीपेक्षा कमी मानधन देण्यात आले. आजच्या परिस्थितीत सर्वसामान्य कामगाराची रोजंदारी 500 ते 600 रुपये आहे आणि जे विशेष प्रशिक्षीत कामगारांना 800 ते 1200 रुपये रोजंदारी मिळते. मतदान केंद्रावर मतदान केंद्र अध्यक्षाला 350ं रुपये प्रति रोज प्रमाणे चार दिवसाचे 1700 रुपये, चार मतदान अधिकाऱ्यांना 250 रुपये रोज प्रमाणे चार दिवसांचे 1300 रुपये प्रत्येकी, पोलीस अंमलदाराला 250 रुपये प्रति रोज प्रमाणे दोन दिवसांचे 500 रुपये, बीएलओला दोन दिवसाचे 500 रुपये, शिपाई या पदातील व्यक्तील दोन दिवसाचे 400 रुपये, अंगणवाडी सेविका आणि आशावर्करला एक दिवसाचे 200 रुपये प्रमाणे मानधन देण्यात आले. तरी पण या सर्वांनी आपले मेहनत पणाला लावली आणि निवडणुकीत प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला.
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्र अध्यक्षाकडून नमुना क्रमांक 17 किती उमेदवारांनी भरून घेतला याची माहिती आज तरी प्राप्त झाली नाही. ही माहिती भरून घेणे उमेदवारांसाठी अत्यंत आवश्यक आहे. तरच पुढे काही समस्या तयार झाली तर हा नमुना क्रमांक 17 उमेदवारांच्या कामी येणारा अभिलेख आहे. पण वृत्तलिहिपर्यंत कोणी नमुना क्रमांक 17 भरून घेतला आणि कोणी घेतला नाही याची माहिती उपलब्ध झाली नाही.
Post Views: 66