गेल्या पस्तीस वर्षांपासून गुरूद्वारा बोर्डाच्या वतीने नियमितपणे सामुहिक विवाह मेळावा सामाजिक उपक्रम राबविला जात आहे. या मेळाव्यात लग्न करणाऱ्या जोडप्यां कडून संपूर्ण कागदोपत्री पुर्तता केल्या नंतर मेळाव्यात प्रवेश देऊन संपूर्ण धार्मिक मर्यादाने लग्न पार पाडल्यानंतर जोडप्यांना गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने मैरेज सर्टिफिकेट प्रदान केल्या जाते. परंतु जेंव्हा महानगरपालिका कडे याच जोडप्यांना मैरैज सर्टिफिकेट काढायचा असतो त्या वेळी या गुरूद्वारा बोर्डाच्या प्रमाणपत्रास काडी मोल ही किंमत राहत नाही. व सर्व प्रोसिजर सुरूवाती पासून तयार करावे लागते. संचखड गुरूद्वारा बोर्ड ही धार्मिक संस्था 1956 च्या कायद्यान्वये माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या देखरेखीखाली गुरुद्वारा बोर्ड चा कारोबार चालत असताना गुरूद्वारा बोर्ड च्या प्रमाणपत्रास शासकीय मान्यता नसणे ही फारच दुर्भावनायुक्त बाब म्हणावी लागेल. माझी महानगरपालिका आयुक्त साहेबांना व प्रशासनाला नम्र विनंती आहे की मागील गेल्या पस्तीस वर्षांत ज्या ज्या जोडप्यांनी सामुहिक विवाह मेळाव्यात लग्न केले असेल त्यांचे गुरूद्वारा बोर्ड च्या लग्नाच्या प्रमाणपत्रास मान्यता देऊन त्यांना मैरैज सर्टिफिकेट प्रदान करण्यात यावे. तसेच येत्या डिसेंबर च्या सात आठ तारखेला गुरूद्वारा बोर्ड च्या साजरा होणाऱ्या सामुहिक विवाह मेळाव्यात त्याच ठिकाणी महानगरपालिका तर्फे अधिकारी बसवून त्यांना तिथल्या तिथे प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे.
–राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड 7700063999*
Post Views: 76