किनवट, हदगाव व लोहा येथे त्या-त्या ठिकाणी मतमोजणी
नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा सार्वत्रिक निवडणुका आणि लोकसभेची पोटनिवडणुक यांच्या मतांची मोजणी उद्या दि.23 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभांपैकी लोहा,किनवट आणि हदगाव या तिन विधानसभा निवडणुकांची मतमोजणी त्या-त्या तालुक्यात होणार आहे. नांदेड येथे मतमोजणीच्या तयारीसाठी भरपूर मोठी यंत्रणा कामी लागली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणी करणारे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रवेश मिळणार आहे.
नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. निवडणूक आयोगाने 21 तारखेला दुपारी जाहिर केलेल्या अंतिम आकडेवारी नुसार नांदेड जिल्ह्याने यावेळी 2019 च्या तुलनेने विक्रमी मतदान केले असून यावेळी विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान झाले आहे. तर लोकसभा पोटनिवडणुकीतही गेल्या वेळेच्या तुलनेत 7 टक्के अधिक मतदान झाले असून ही टक्केवारी 67.81 आहे.
उद्या शनिवार 23 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ज्ञान स्त्रोत केंद्र ( नॉलेज रिसोर्स सेंटर ) येथे सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर विधानसभा व लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पहिल्या माळयावर खोली क्रमांक 102 व खोली क्रमांक 6 याठिकाणी सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी होणार असून सर्व मतयंत्र याठिकाणच्या स्ट्रॉगरुमध्ये पोहोचले आहे. तसेच दुसऱ्या माळ्यावर खोली क्रमांक 202 ते 206 मध्ये लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणच्या स्ट्रॉगरुममध्ये मतयंत्र पोहोचली आहेत. उमेदवारांच्या उपस्थितीत सर्व मतपेट्या स्ट्रॉंगरुममध्ये बंद झाल्या असून सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्यात आल्या आहेत. 23 नोव्हेंबरला सकाळी उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदान यंत्र बाहेर काढले जातील व त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. याठिकाणी वेगवेगळे कक्ष करण्यात आले असून उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी देखील थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभेची 14 टेबलावर मोजणी होणार आहे. लोकसभा व विधानसभेसाठी 14 गुन्हीले 6 असे 84 टेबल लोकसभा आणि विधानसभासाठी असणार आहे. अंदाजे 24 ते 28 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
नांदेड लोकसभेसाठी 19 लाखांच्यावर तर विधानसभेसाठी 27 लाखांच्यावर मतदार संख्या आहे. दरम्यान काल झालेल्या मतदानात शेवटच्या मतदानाची आकडेवारी आज हाती आली आहे. रात्री उशिरापर्यत मतदान सुरु होते. त्यामुळे आज अंतिम आकडेवारी पुढे आली आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भोकर मतदारसंघात सर्वात जास्त 76.33 टक्के तर सर्वात कमी 86-उत्तरमध्ये 60.60 टक्के मतदान झाले आहे. तर 87-नांदेड दक्षिणमध्ये 63.99, नायगावमध्ये 74.02, देगलूर 63.22, मुखेड 70.14 टक्के मतदान झाले आहे, असे एकूण 67.81 टक्के मतदान झाले आहे.
तर विधानसभेसाठी किनवटमध्ये 71.95 टक्के, हदगावमध्ये 71.77, भोकर मतदारसंघात 76.33, नांदेड उत्तरमध्ये 60.6 टक्के, नांदेड दक्षिणमध्ये 63.99 टक्के, लोहा मतदारसंघात 75.2 टक्के, नायगाव मतदारसंघात 74.03 टक्के, देगलूर मतदारसंघामध्ये 63.22 टक्के, मुखेड मतदारसंघात 70.14 असे एकूण 69.45 टक्के मतदान झाले आहे. विधानसभेसाठी सर्वात जास्त भोकर येथे 76.33 टक्के मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदान नांदेड उत्त्तर मध्ये 60.6 मध्ये झाले आहे.
लोकसभा स्त्री-पुरुषनिहाय मतदान
लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भोकर मतदारसंघात पुरुष 1 लाख 20 हजार 117 तर महिला 1 लाख 11 हजार 236 व इतर 3 असे एकूण 2 लाख 31 हजार 356 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात पुरुष 1 लाख 13 हजार 524 तर महिला 1 लाख 3 हजार 983 तर इतर 15 असे एकूण 2 लाख 17 हजार 522 तर नांदेड दक्षिण मतदारसंघात पुरुष 1 लाख 6 हजार 390 व महिला 96 हजार 326 व इतर 2 असे एकूण 2 लाख 2 हजार 718 मतदारांनी आपला हक्क बजावला.
नायगाव मतदारसंघात पुरुष 1 लाख 19 हजार 637 तर महिला 1 लाख 10 हजार 114 व इतर 1 असे एकूण 2 लाख 29 हजार 752 मतदारांनी मतदान केले. देगलूर मतदारसंघात पुरुष 1 लाख 2 हजार 290 महिला 95 हजार 111 व इतर 8 असे एकूण 1 लाख 97 हजार 409 मतदारांनी मतदान केले. मुखेडमध्ये पुरुष 1 लाख 11 हजार 876 तर महिला 1 लाख 3 हजार 524 व इतर 2 असे एकूण 2 लाख 15 हजार 402 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
विधानसभा निहाय स्त्री-पुरुष निहाय मतदान
किनवट मतदारसंघात पुरुष 1 लाख 4 हजार 154 महिला 96 हजार 342 व इतर 3 असे एकूण 2 लाख 499 मतदारांनी मतदान केले. हदगाव मतदारसंघात पुरुष 1 लाख 13 हजार 105 , महिला 1 लाख 1 हजार 546 व इतर 2 असे एकूण 2 लाख 14 हजार 653 मतदारांनी मतदान केले. भोकर मतदारसंघात पुरुष 1 लाख 20 हजार 223 महिला 1 लाख 11 हजार 239 व इतर 3 असे एकूण 2 लाख 31 हजार 365 मतदारांनी मतदान केले. 86 नांदेड उत्तर मध्ये पुरुष 1 लाख 13 हजार 522 महिला 1 लाख 3 हजार 978 , इतर 15 असे एकूण 2 लाख 17 हजार 515 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
नांदेड दक्षिणमध्ये पुरुष 1 लाख 6 हजार 399 महिला 96 हजार 331 तर इतर 2 असे एकूण 2 लाख 2 हजार 732 मतदारांनी मतदान केले. लोहा मतदारसंघात पुरुष 1 लाख 17 हजार 651 महिला 1 लाख 9 हजार 183 व इतर 3 असे एकूण 2 लाख 26 हजार 837 मतदारांनी मतदान केले.
नायगाव मतदारसंघात पुरुष 1 लाख 19 हजार 642 महिला 1 लाख 10 हजार 114 व इतर 1 असे एकूण 2 लाख 29 हजार 757 मतदारांनी तर देगलूर मतदारसंघात पुरुष 1 लाख 2 हजार 289 तर महिला 95 हजार 111 इतर 8 असे एकूण 1 लाख 97 हजार 408 मतदारांनी आपला हक् बजावला. मुखेड मतदारसंघात पुरुष 1 लाख 11 हजार 875 व महिला 1 लाख 3 हजार 524 इतर 2 असे एकूण 2 लाख 15 हजार 401 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असे एकूण 27 लाख 87 हजार 947 मतदारापैकी 19 लाख 36 हजार 167 उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला.
किनवट, हदगाव व लोहा येथे त्या-त्या ठिकाणी मतमोजणी
किनवटला आयटीआय कॉलेजमध्ये तर हदगावला समाज कल्याण भवन येथील अनुसूचित जातीचे मुलींचे शासकीय वसतीगृह तर लोहा येथे महसूल हॉल, तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
सुसज्ज मीडिया कक्ष
भारत निवडणूक आयोगाने ज्यांना हिरव्या रंगाची प्राधिकार पत्र दिले अशा पत्रकारांना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. याठिकाणी माध्यम प्रतिनिधींना संपर्क करण्यासाठी इंटरनेट, संगणक, टिव्हीची व खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे. पत्रकारांना माध्यम कक्षापर्यत आपला मोबाईल वापरता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी कक्षाच्या आतमध्ये मोबाईल घेवून जाण्यास परवानगी असणार नाही. याठिकाणी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांसोबत पाच किंवा त्यापेक्षा मर्यादित पत्रकारांचा गट करुन पाहणी करता येईल. माध्यम कक्षातून फेरीनिहाय माहिती, परवानगी मिळालेले छायाचित्र ई-मेल व व्हॉटसअप ग्रुपवर प्रसिध्दीसाठी देण्यात येईल.
Post Views: 40