नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी निवडणुक संपल्यानंतर उत्कृष्ट काम करून निवडणुक प्रक्रियेत मेहनत घेतली यासाठी आपल्या पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांचा सन्मान केला आहे. ही नवीन पध्दत दखल योग्य आहे.
कोणताही बंदोबस्त करतांना पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकारी व अंमलदारांना बिनतारी संदेशावर शाब्बास अशा सुचना करून त्यांचा उत्साह वाढवतात ही प्रथा आहे. पण 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक विष्णु कऱ्हाळे, पोलीस उपनिरिक्षक बाबूराव जाधव यांनी आपल्या पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अंमलदारांना शाल, पुष्प आणि मिठाई देवून त्यांचा सन्मान केला. ही घटना नक्कीच दखल योग्य आहे. कारण वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्यसा कनिष्ठाला अशा प्रकारे उत्साहवर्धक कृती केली तर त्याची काम करण्याची क्षमता जास्त वाढते.
Post Views: 6