पोलीस निरिक्षक आणि त्यांची पत्नी अडकले 2 कोटी 7 लाख 31 हजार 358 रुपये 70 पैशांच्या अपसंपदेत


नांदेड(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलीस निरिक्षक आणि त्यांच्या पत्नीविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 2 कोटी 7 लाख 31 हजार 358 रुपये 70 पैसे अर्थात त्यांच्या कायदेशीर आणि ज्ञात उत्पान्नाच्या स्त्रोतापेक्षा 116.28 टक्के जास्त अपसंपदा जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पोलीस निरिक्षक हरीभाऊ नारायण खाडे कधी काळी नांदेडमध्ये पोलीस उपनिरिक्षक या पदावर कार्यरत होते.
बीड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीड येथील पोलीस उपअधिक्षक शंकर किशनराव शिंदे यांनी ही तक्रार दिली आहे. दि.10 ऑगस्ट 2013 ते 16 मे 2024 अशा 9 वर्षाच्या कालखंडाबाबत बीड जिल्ह्यातील आर्थिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलीस निरिक्षक हरीभाऊ नारायण खाडे जे सध्या निलंबित आहेत. यांच्याकडच्या अपसंपदेची उघड चौकशी करण्यात आली. या सर्व चौकशीमध्ये त्यांच्याकडे कायदेशीर उत्पन्नापेक्षा 116.28 टक्के अपसंपदा सापडली. त्या अपसंपदेपैकी 62 लाख 79 हजार 953 रुपयांची अपसंपदा पोलीस निरिक्षक यांच्या पत्नी सौ.मनिषा हरीभाऊ खाडे यांच्या नावाने आहे. ज्यामुळे त्यांनी अपसंपदा जमविण्यासाठी पोलीस निरिक्षकाला प्रोत्साहन दिले असा त्यातील आरोप आहे.
बीड शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 आणि कलम 12 नुसार पोलीस निरिक्षक हरीभाऊ नारायण खाडे आणि त्यांच्या पत्नी सौ.मनिषा हरीभाऊ खाडे यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 107/2024 मध्ये मिळालेल्या अनुशंगाने ही उघड चौकशी झाली होती. आता 2 कोटी 7 लाख 31 हजार 358 रुपये 70 पैसे या अपसंपदेसाठी नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक किरण बगाटे हे करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधिक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कार्यवाही पुर्ण केली आहे.


Post Views: 436






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *