नांदेड(प्रतिनिधी)-मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोलीस अंमलदाराने एका विशिष्ट पक्षाला मतदान करण्याची सुचना देत होता. यावर आक्षेप घेतल्यानंतर त्याने तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो, खंडणीची गुन्हे दाखल करतो असे सांगून धमकी दिल्याची तक्रार एका युवकाने निवडणुक निर्णय अधिकारी नांदेड, पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड आणि पोलीस अधिक्षक नांदेड यांच्याकडे केली आहे.
जसबिरसिंघ महेंद्रसिंघ बुंगई या युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार दि.20 नोव्हेंबर रोजी त्यांचे मतदान करण्यासाठी ते कलगीधर शाळा येथे सायंकाळी 5 वाजता गेले असतांना तेथे मतदान केंद्रावर कार्यरत पोलीस अंमलदार विजय नंदे हा तेथे हजर असलेल्या मतदारांना एका विशिष्ट पक्षाला मतदान करण्याच्या सुचना देत होता. या सुचनामध्ये तो मतदारांना धमकावत होता. मी यावर आक्षेप उचलला असता. तु तुझे काम कर नाही तर तुला याचे परिणाम भोगावे लागतील असे सांगत मलाच धमकी दिली. तुझ्याविरुध्द खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करील असे सांगून माझीच कॉलर पकडून मला बळजबरी गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे हजर असणारे मनिंदरसिंघ रामगडीया आणि जगजितसिंघ खालसा यांनी सोडवा-सोडव केली. मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा मुलभुत अधिकार आहे. त्यावर कोणी जबाव आणून कोण्या अमुक पक्षाला मतदान करा असे म्हणून शकत नाही. तेंव्हा मतदान करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या पोलीस अंमलदार विजय नंदे विरुध्द योग्य कायदेशीर कार्यवाही करावी व मला त्याच्यापासून संरक्षण देण्यात यावे अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.
Post Views: 347