नांदेड,(प्रतिनिधी)-समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन बिल काढून देण्यासाठी 54 लाख रुपये लाच मागणी करून 48 लाख रुपये लाच स्वीकारणाऱ्या दोन जणांना पकडून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13 नोव्हेंबर 2024 रोजी प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कुंटूरकर निवासी दिव्यांग कार्यशाळा राजनगर नांदेड येथील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन बिल समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेण्यासाठी शिवराज विश्वनाथ बामणे, लिपिक नेमणूक छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालय काबरा नगर नांदेड, यादव मसनाजी सूर्यवंशी मुख्याध्यापक नेमणूक वैभव निवासी शाळा खानापूर तालुका देगलूर आणि चंपत आनंदराव वाडेकर लिपिक नेमणूक कुंटूरकर निवासी दिव्यांग कार्यशाळा राजनगर या तिघांनी 54 लाख रुपये लाच मागणी केली. लाच मागणी 13 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर, 18 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर 2024 रोजी झाली. बँकेत पैसे जमा झाल्यानंतर बँकेतून काढून लाचेची रक्कम द्यायची होती. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी शिवराज बामणे आणि चंपत वाडेकर हे छत्रपती चौका जवळील बिरसा मुंडा चौकात तक्रारदाराकडून ठरलेल्या लाचेच्या रकमेपैकी 40 लाख रुपये लाच स्वीकारून दुचाकी वर जात असताना त्यांना पकडण्यात आले आहे. शिवराज बामणे आणि चंपत वाडेकर सध्या लाच बस प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात आहेत. त्यांच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात एवढ्या मोठ्या रकमेची लाच पहिल्यांदाच पकडण्यात आली आहे.
प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. संजय तुंगार, पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन बोडके, पोलीस अंमलदार राजेश राठोड, अरशद अहमद खान,सय्यद खदीर आणि प्रकाश मामुलवार यांनी ही कार्यवाही केली.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा
दुरध्वनी 02462-253512टोल फ्रि क्रमांक 1064
Post Views: 229